बीड (रिपोर्टर)ः- तिन दिवसापासून जिल्हाभरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. काल झालेल्या पावसाने रब्बी पिकांच मोठं नुकसान झालं. काढणीला आलेले पिके भुईसपाट झाली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर आजसकाळपासून पंचनाम्याला सुरूवात झाली. तलाठी कृषीसहाय्यक हे कर्मचारी पंचनामे करत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी म्हटले आहे. नुकसानीचा आकडा नेमका किती हे उद्यापर्यंत समोर येईल.
महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला. तिन दिवसापासून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गाराचा वर्षाव झाला. काल बीड जिल्ह्यातील विविध भागात गारा पडल्या. यामुळे ज्वारी, गहु, हरभरा, मका, आंबा, मोसंबी, लिंबु, चिकू, डाळींब, खरबुज, टरबुज सह आदि पिकांचे नुकसान झाले. काही शेतकर्यांनी गहु,ज्वारी काढून ठेवली होती. त्यापिकाला पावसामुळे करे येवू लागली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर आजसकाळपासून पंचनाम्याला सुरूवात झाली. तलाठी कृषी सहाय्यक यांच्या मार्फत पंचनामे सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली. नुकसान किती हेक्टर मध्ये झाले याचा नेमका आकडा उद्यापर्यंत स्पष्ट होईल.
केज तालुक्यात पंचनामे करण्याचे तहसिलदारांचे आदेश
केज तालुक्यात काल झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार दुलाजी मेंडगे, नायब तहसिलदार लक्ष्मण धस यांनी संबधीत यंत्रणेला दिले आहे. तालुक्यातील मस्साजोग, काळेगांव, नांदुरघाट, पिंप्री, हातगांव, डोका, सातेफळ, माळेगांव, कोरेगांव, होळ, चंदनसावरगाव, चिंचोळीमाळी, युसूफवडगांव, विडा, आडस, येवता, लहुरी, सुर्डी, आनंदगांव, कानडी यासह आदि परिसरामध्ये गारपीट झालेली आहे.
वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशावरुन आंदोलनकर्ते कर्मचारी करु लागले पंचनामे
सध्या कर्मचार्यांचा संप सुरू आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले असून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन त्याचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांनी महसुल विभागाला दिल्यानंतर महसुल विभागाच्या कर्मचार्यांनी वरिष्ठांच्या आदेशानूसार आंदोलनातही पंचनामे सुरू केले आहे.