Home क्राईम कार-दुचाकी अपघातात एक जागीच ठार, एक गंभीर

कार-दुचाकी अपघातात एक जागीच ठार, एक गंभीर


नेकनूर (रिपोर्टर):- कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील मोरगाव फाटयाजवळ आज सकाळी साडेनऊ वाजता घडली.
संजय भाऊसाहेब हुंबे (रा. चौसाळा, वय ४५) आणि राजेंद्र भोंड हे दोघे दुचाकीवरून मोरगाव येथे जात होते. समोरून ह्युंडाई कंपनीची चारचाकी क्र. एम.एच. २३ ए.डी. ४३२१ ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात संजय हुंबे हे जागीच ठार झाले तर राजेंद्र भोंड हे जखमी झाले आहेत. तर चारचाकी गाडीतीलही काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version