Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडपदोन्नतीच्या आरक्षणासाठी बीडमध्ये रिपाइंची निदर्शने

पदोन्नतीच्या आरक्षणासाठी बीडमध्ये रिपाइंची निदर्शने


बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्र शासनाने ७ मे रोजी मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय मागासवर्गीय कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा असून असंविधानिक व बेकायदेशीर असल्यामुळे तो तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आज रिपाइंच्या वतीने बीडमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली.
पदोन्नतीतील आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. महाविकास आघाडी सरकार हे स्वत:ला कितीही पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्‍नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे गोरगरिब, मागासवर्गीय आणि दिनदलित विरोधी सरकार आहे. मागासवर्गीयांचा पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारने लवकर वापस घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने यापुढेही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांनी दिला. या वेळी राजू जोगदंड, मझहर खान, किसन तांगडे, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, महेंद्र वडमारे, प्रभाकर चांदणे, सुभाष तांगडे, पप्पु पवार, पप्पू वाघमारे, भास्कर जायभाये आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!