Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडधारूर‘२५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे’ म्हणत धारूरच्या तरुणाला गंडा

‘२५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे’ म्हणत धारूरच्या तरुणाला गंडा

किल्ले धारूर (रिपोर्टर)धारूर शहरातील कादरी बाग परिसरामध्ये राहणारा तरुण तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे मी अमिताभ बच्चन बोलतोय असे म्हणत त्या तरुणाच्या खात्यावरील सर्व पैसे लंपास करून तरुणाला आर्थिक गंडा घातला आहे


धारुर शहरातील कादरी बाग परिसरातील तय्यब मोमीन या तरुणाला मी केबीसी मधून अभिताभ बच्चन बोलतोय आणि तुम्हाला २५ लाख रुपयाची लॉटरी लागली आहे असा फोन आला तुम्हाला २५ लाख रुपये पाहिजे असतील तर तुम्ही आत्ताच जी एस टी चे १६१०० रुपये भरा म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यावर २५ लाख रुपये येतील व ते जीएसटी चे पण येतील असे फसवा कॉल आला हा तरुण म्हणाला तुम्ही काय २५ लाख रुपये मधूनच सोळा हजार शंभर वजा करून घ्या परंतु तसे त्यांनी केले नाही तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओ टी पी आम्हाला सांगा तुमच्या खात्यात आम्ही लगेच पैसे ट्रान्सफर करतो असे म्हणून त्या तरुणाला फसवण्यात आले
मोबाईल वरील ओटीपी सांगताच खात्यामध्ये आसलेले सर्व पैसे अगदी काही सेकंदातच त्या बनावट कॉल वाल्या व्यक्तीने लंपास केले मोमीन यांनी आपल्या खात्यात पाहिले असता झिरो झिरो बॅलन्स त्यांना दिसून आले आपले खाते बंद होऊ नये यासाठी त्यांनी दुसर्‍या दिवशी शंभर रुपये खात्यात टाकले पण दुर्दैवाने ते शंभर रुपये ही बनावट अभिताभ बच्चनने लंपास केले यावरून आपल्याला चांगलाच आर्थिक गंडा घातल्याचे तरुणाच्या लक्षात आले त्याने लागलीच युवा पत्रकार संघाच्या तरुण पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांच्या लक्षात आले की माझी आर्थिक फसवणूक झाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!