Monday, June 14, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द

नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द


नागपूर (रिपोर्टर):- खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र आज कोर्टानं रद्द केलं आहे. नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. अमरावतीची जागा ही खरं तर अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यावर नवनीत राणा यांनी खासदारकीची निवडणूक लढली होती. त्यांचा विजयी ठरल्या होत्या. या विरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. मात्र आता कोर्टानं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे 2014 साली नवनीत राणा यांच्या विरोधात निवडून आले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावेळी नवनीत राणा यांनी जात प्रामाणपत्र देऊ करून निवडणूक लढली होती. मात्र आता या विरोधात 2017 साली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. हा संविधानिक घोटाळा असल्याचं कोर्टानं म्हंटल आहे. त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!