Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात 274 बालकांच्या पित्यांचा कोरोनाने मृत्यू

जिल्ह्यात 274 बालकांच्या पित्यांचा कोरोनाने मृत्यू


बीड (रिपोर्टर):- कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर दुसरी लाट आली. दुसर्‍या लाटेमध्ये अनेक नागरीकांचा मृत्यू झाला. यात कित्येक बालक अनाथ झाले. ज्या बालकांचे माता-पिता मरण पावले अशा 18 वर्षाखालील बालकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 274 मुलांचे पिता मरण पावले असल्याचे समोर आले आहे. तीन बालकांचे माता आणि पिताही मरण पावले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून देशभरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. पहिल्या लाटेमध्ये नागरीक कमी प्रमाणात मरण पावले होते. मात्र दुसरी लाट खतरनाक ठरली. या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. कित्येक बालकांचे मातापिता मरण पावल्याने हे बालक उघड्यावर पडले. 18 वर्षाखालील किती बालकांचे माता-पिता मरण पावले याचे सर्व्हेक्षण अंगणवाही सेविका, आश कार्यकर्ती यांच्यासह ग्रामरक्षक कृती दलाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मराठवाड्यात हे सर्व्हेक्षण करण्यात आले असून यामध्ये बीड जिल्ह्यातील 274 पिता आणि 26 माता मरण पावल्या आहेत. 3 बालकांचे माता आणि पिताही मरण पावल्याचे सर्व्हेक्षणामध्ये समोर आले आहे. क

Most Popular

error: Content is protected !!