Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमजमीन खरेदीत दलाली खाल्ली म्हणत एकाचे डोके फोडले

जमीन खरेदीत दलाली खाल्ली म्हणत एकाचे डोके फोडले


बीड (रिपोर्टर):- आम्ही खरेदी केचलेल्या जमीनीमध्ये तू पाच हजार रुपये दलाली खाल्लीस असे म्हणून एकास मारहाण करत गंभीर जखमी करून दगडाने डोके फोडल्याची घटना आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथे घडली.
या प्रकरणी ज्ञानदेव दशरथ कांबळे (वय 65 वर्षे रा. गहुखेल ता. आष्टी ह.मु. मुर्शदपूर) याने आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी अरुण संभाजी शेंडगे, संभाजी शेंडगे (रा. मुर्शदपूर) यांनी संगनमत करून मुर्शदपूर येथे तू आमच्या खरेदी केलेल्या जमीनीत मध्यस्थी करून पाच हजार रुपये खाल्लेस असे म्हणत कांबळे यांना शिवीगाळ करून चापटाने मारहार केली व त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच धमक्या दिल्या. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नाईक उबाळे करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!