Home क्राईम फौजीने पोलीस ठाण्यात घातला धुडगूस बायकोची फिर्याद घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला केली मारहाण

फौजीने पोलीस ठाण्यात घातला धुडगूस बायकोची फिर्याद घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला केली मारहाण


कॉम्प्युटरची केली तोडफोड
बीड (रिपोर्टर):- आमचा घरगुती मॅटर अहे, तुम्ही माझ्या बायकोची फिर्याद घेऊ नका, असे म्हणत फौजीने वडवणी पोलीस ठाण्यात धुडगूस घालत ठाण्यातील सीसीटी, एनएस रुममधील शासकीय, सीपीयू, मॉनिटर व प्रिंटरची तोडफो करून नुकसान केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी सदरील फौजीला वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वडवणी पोलीस ठाण्यात पती त्रास देत असल्या प्रकरणी लक्ष्मी उद्धव मुंडे (वय 27 वर्षे) या तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्या तक्रार देत असतानाच त्या ठिकाणी फौजी उद्धव शिवाजी मुंडे (वय 35, रा. चादरी, ता. धारूर) हे त्या ठिकाणी आले व तक्रार दाखल करून घेणार्‍या अमलदाराला म्हणाले की, हे आमचे घरगुती भांडण आहे, तुम्ही यात दखल देऊ नका, मात्र पोलीस फौजीला म्हणाले की, हा तुमचा घरगुती मॅटर असला तरी महिलेची तक्रार असून त्या ठाण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला त्यांची तक्रार दाखल करून घेणे आवश्यक आहे, असे म्हणताच नशेत असलेल्या फौजी मुंडे यांनी फिर्याद घेणार्‍या पोलीस नाईक राम बारगजे यांचे गचुरे धरून झटापट केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व सीसीटी एनएस रुममधील सीपीयू, मॉनिटर व प्रिंटर फोडून अंदाजे 10 हजार रुपयांचे नुकसान केले. धुडगूस घालणार्‍या फौजीला पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेत त्याच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात कलम 353, 332, 504, 506 भादंवि सह कलम 3 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिरकर हे करत आहेत. त्याच्या पत्नीची तक्रारही पोलीसांनी नोंदवून घेतली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version