Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमघरात घुसून तरुणाला मारहाण दोघांविरोधात गुन्हा दाखल

घरात घुसून तरुणाला मारहाण दोघांविरोधात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)- पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुक्साना सलीम खान यांच्या घरात शेख अमिर शेख रिजवान, शेख सलमान शेख रिजवान व इतर अनोळखी दोघा जणांनी घरात घुसून रुक्साना सलीम खान हिच्या मुलाला पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून दगडाने दरवाजा फोडत घरातील साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुक्साना सलीम खान यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या दाऊतपुरा पेठ बीड येथील घरी शेख रिजवान, शेख सलमान, शेख अमीर व इतर दोघे अनोळखी इसमांनी घरात येऊन आमच्या दरवाज्यावर दगडे मारली व त्यानंतर घरात घुसून सामानाची नासधूस करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.हे.कॉ. जाधव हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!