बीड (रिपोर्टर): गेवराई तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून काल मध्येरात्री अज्ञात चोरट्यांनी सावरगाव येथे धुमाकूळ घालत एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडले. चारही घरातून सोन्याचांदीसह रोख असा दोन लाखाचा मुद्देमार चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने सावरगाव सह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संदिप वसंत वाघमारे, पांढुरंग कान्होबा मिसाळ, शरद नारायण लोंड, व लक्ष्मण लहूजी मिसाळ यांचे सावरगावमध्ये एकाच गल्लीत घरे आहेत. अज्ञात चोरट्यांनी 22 मार्च रात्री 1 ते 5 च्या दरम्यान बंद घरे फोडून घरातील रोख रक्कम लंपास केली. त्यामध्ये रोख एक लाख 54 हजार रुपये, 7 ग्रॉमचे झुंबर, 4 ग्रॉमची ठुसी, 9 ग्रॉमची अंगठी, 2 ग्रॉमचा बदाम, 2 ग्रॉमची नथ यासह पांडूरंग मिसाळ, लहुजी मिसाळ, शदर लांडे यांच्याही घरातून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम लंपास झाली आहे. या प्रकरणी संदिप वसंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरु गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.