Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनासावधान! आज पॉझिटिव्हचा आकडा वाढला

सावधान! आज पॉझिटिव्हचा आकडा वाढला

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात असले तरी नागरिकांनीआपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. अनावश्यक ठिकाणी गर्दी केली जात असल्याने पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काल 146 पॉझिटिव्ह रुग्ण आले होते. आज पुन्हा त्यात वाढ होऊन 168 पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने राज्यातले लॉकडाऊन उघडण्यात आले. बीड जिल्ह्यात सकाळी सात ते चार या दरम्यान सर्व व्यवहार सुरू ठेवण्णयाची परवानगी देण्यात आली. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात होते मात्र आज आलेल्या पॉझिटिव्ह आकड्यात काही प्रमाणात वाढ झाली. काल 146 पॉझिटिव्ह होते तर आज 168 पॉझिटिव्ह आले. 3 हजार 277 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 3 हजार 445 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. अंबाजोगाईत 19, आष्टीत 25, बीडमध्ये 33, धारूर 6, गेवराई 15, केज 25, माजलगाव 12, परळी 9, पाटोदा 5, शिरूर 14 आणि वडवणीमध्ये पाच पॉझिटिव्ह आढळून आले. नागरिकांनी आपआपल्या आरोग्याची काळजी घेत सोशल डिस्टंन्सिंग पाळत बाजारात गरज पडल्यासच बाहेर पडायला हवे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!