Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमबाळांतपणासाठी माहेरी का जातेस म्हणत भावजईला मारहाण

बाळांतपणासाठी माहेरी का जातेस म्हणत भावजईला मारहाण

बीड (रिपोर्टर)- बाळांतपणासाठी तू माहेरी का जातेस, असे म्हणून शिवीगाळ करत पोटात लाथा बुक्क्या घालून व लोखंडी खीळ डोक्यात मारून चुलत दिराने भावजईला गंभीर जखमी केल्याची घटना गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे घडली असून या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात कृष्णा बबन प्रधान याच्या विरोधात कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली विशाल प्रधान (वय ३०, रा. धोंडराई) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा चुलत दिर कृष्णा बबन प्रधान याने दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता माझ्या घरी येऊन मला म्हणाला की, तू बाळांतपणासाठी माहेरी का जातेस, असे म्हणून शिवीगाळ करत माझ्या पोटात लाथा बुक्क्या मारल्या, त्यानंतर लोखंडी खीळ डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!