बीड(रिपोर्टर): गावात खंडोबा यात्रा झाल्यानंतर त्या यात्रेच खर्च- जमा- शिल्लक असा हिशोब का मागितलास म्हणून एकाला लोखंडी गजाने, हॉकी स्टिकने मारहाण करुन गंभिर जखमी केले. ही घटना आष्टी तालुक्यातील टाकळी अमीया येथे 19 मार्च रोजी घडली. सचिन बबन एकशिंगे (वय 34 वर्षे, रा. टाकळी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील खंडोंबाच्या यात्रेतील खर्चाचा हिशोब विचारला होता. यावरुन त्याला ज्ञानेश्वर चौधरी, संकेत चौधरी, हनुमंत चौधरी, बबन एकनाथ चौधरी सर्व रा. टाकळी यांनी लोखंडी गजाने, हॉकी स्टिकने मारहाण करुन गंभिर जखमी केले. याप्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल आहे.