बीड (रिपोर्टर) :-क्रेडिट कार्ड वापरणार्या एक शिक्षकाला 80 हजार रुपयाला गंडवल्याची घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अज्ञात भामट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम विश्वनाथ ढास या शिक्षकांना 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या मोबाईलवर 79 हजार 520 रुपये कटलेल्या एसएमएस आला. त्या शिक्षकांनी कुठलाही ओटीपी अथवा कोणतीही लिंक ओपन केली नव्हती असे त्यांची म्हणणे आहे. तरी त्यांच्या अकाऊंटवरुन पैसे कट झाले. या प्रकरणी काल शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.