Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमघरातून दोन मोबाईल पळवले भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील घटना

घरातून दोन मोबाईल पळवले भक्ती कन्स्ट्रक्शन भागातील घटना


बीड (रिपोर्टर):- घरामध्ये चार्जींगसाठी लावलेले दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी आज सकाळी चोरून नेले. ही घटना भक्ती कन्स्ट्रक्शन भागात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका सुनिल कुलकर्णी व सुनिल कुलकर्णी या पती-पत्नीने आपले मोबाईल घरात चार्जींगला लावलेले होते. अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा उचलून घरात घुसून दोन्ही मोबाईल चोरून नेले. या मोबाईलची किंमत 24 हजार रुपये इतकी होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करर्‍यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!