Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमउपजिल्हाधिकार्‍यांची वाळु माफियांवर कारवाई

उपजिल्हाधिकार्‍यांची वाळु माफियांवर कारवाई

अवैध वाळु वाहतुकीचे दोन टिप्पर पकडले तर एक फरार

माजलगाव (रिपोर्टर)-येथील उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी वाळू माफियांवर कारवाई केली असुन अवैध वाळु वाहतुक करणारे दोन टिप्पर दि. १७ नोव्हेंबरला रात्री दोन वाजता तालखेड फाट्यावर व संभाजी चैकात पकडले तर एक टिप्पर पळुन जाण्यात यशस्वी ठरला आहे.
दरम्यान उपजिल्हाधिका-यांच्या या कारवाईने वाळु माफियांचे धाबे दणाणले आहेत. काल रात्री दोन वाजता उपजिल्हाधिकारी व त्यांची टिम वेगवेगळ्या भागात रवाना झाली व कुठे अवैध वाळु वाहतुक सुरू आहे याचा तपास घेत होते. त्याचवेळी त्यांच्यासमोर दोन चोरटी वाळु वाहतुक करणारे टिप्पर आले असता त्यांनी हे दोन्ही टिप्पर अडवुन रितसर कारवाई करत दोन्ही टिप्पर जप्त करत तहसिल कार्यालयात आणले आहेत. माजलगाव तालुक्यामध्ये कुठल्याही वाळु घाटाचा ठेका चालु नसतांनाही अवैधरित्या व चोरटी वाळु वाहतूक वाळू माफिया करत आहेत. याची माहिती उपजिल्हाधिकार्‍यांना मिळाल्या-वरून त्यांनी ही कारवाई केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!