Tuesday, September 21, 2021
No menu items!
HomeUncategorizedराऊत साहेब, उतलेल्या-मातलेल्या वीज कंपनी अधिकार्‍यांना खडेबोल सुनवा बीड शहर आठ महिन्यांपासून...

राऊत साहेब, उतलेल्या-मातलेल्या वीज कंपनी अधिकार्‍यांना खडेबोल सुनवा बीड शहर आठ महिन्यांपासून अंधाराच्या साम्राज्यात

नगरपालिकेने सहा कोटी भरूनही वीज पुरवठा बंदच
बीड (रिपोर्टर):- बीड नगरपालिकेकडे थकबाकी असल्याचे कारण पुढे करत गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शहरातले पथदिवे वीज कंपनीने बंद केले आहेत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य असून वीज कंपनीच्या या आक्रमक कार्यवाहीनंतर न.प.ने कोरोनाच्या कार्यकाळात पाच ते सहा कोटी रुपये कंपनीला भरल्यानंतरही कंपनीचे अधिकारी अडेलतट्टुपणा करत शहरातील पथदिवे सुरू करत नसल्याने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब अशा उतलेल्या-मातलेल्या अधिकार्‍यांना खडेबोल सुनवा, न.प. आणि वीज मंडळ शासनाच्या अधिपत्याखाली आहे. या दोघांच्या भांडणात सर्वसामान्य बीडकरांना अंधाराच्या खाईत लोटू नका आणि शहरातले पथदिवे तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्या, अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.


राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे बीड दौर्‍यावर आज येत असल्याने शहरातील नागरिकांनी राऊत यांची भेट घेण्याचे ठरवून वीज कंपनीच्या उतलेल्या मातलेल्या अधिकार्‍यांचे कारनामे कानावर गालण्याचे ठरवले आहे. शहरातील वीज कंपनीचे अधिकारी अडेलतट्टु भूमकेत दिसून येतात. बीड नगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे कारण पुढे करत गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा अधिकार्‍यांनी खंडीत केला. जोपर्यंत नगरपालिका थकीत बील भरत नाही तोपर्यंत वीजपुरवठा सुरू करणार नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर कोरोनाच्या अशा भयान परिस्थितीत शहरवासियांना अंधारमुक्त करण्याइरादे नगरपालिकेने पाच ते सहा कोटी रुपये वीज कंपनीला भरले मात्र आणखी पैसे भरा तेव्हाच बीड शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करू, या हय्टाला पेटत वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी अद्यापपर्यंत पथदिवे सुरू केले नाहीत. नगरपालिकेने कोरोनाच्या भीषण कार्यकाळामध्ये वीज कंपनीला पैसे भरूनही पथदिवे सुरू करत नसल्याने न.प. व वीज कंपनीच्या भांडणात शहरवासियांना मात्र अंधाराच्या साम्राज्यात रहावे लागत आहे. वीज कंपनीकडून नगरपालिकेला जे बील देण्यात येते तेही अंदाजपंचे 25 लाखांच्या पुढचे असते. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात बीड नगरपालिकेने जास्त वीज खर्च होऊ नये म्हणून शहरात कमी वीज खर्च होणार्‍या एलईडी लावल्या. त्यानंतरही वीज कंपनीचे अधिकारी बीड नगरपालिकेला 25 लाखांच्या पुढचे बील देतात. एवढेच नाही तर बीड नगरपालिकेने हे अतिताईपणाचे बील न देता जालना शहराला ज्या पद्धतीने पथदिव्यांसाठी मिटर लावले आहेत तसे मिटर लावून वीज बील द्यावे, अशी मागणी वीज कंपनीकडे वेळोवेळी केली, परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. अंदाजपंचे 25 लाख रुपये बील दिल्यानंतर ते थकित राहिल्यावर त्यावर कंपनी अठरा टक्के व्याजदर आकारते. या चक्रवाढ व्याजामुळे नगरपालिकेकडे वीज वापरापेक्षा कित्येक पटीने थकबाकीचा आकडा फुगवला गेल्याचे दिसून येते. अशा स्थितीत पाच ते सहा कोटी रुपये भरल्यानंतरही वीज कंपनीचे अधिकारी ज्या निगरगट्टपणे बीड नरगपालिकेची अडवणूक करून शहरवासियांना अंधाराच्या खाईत लोटत आहे ती पद्धत जाणीवपुर्वक सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारी आहे. म्हणून राऊत साहेब, बीड नगरपालिका आणि वीज कंपनी यांच्या वादाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. शहरवासियांना अंधाराच्या साम्राज्यात रहावे लागत आहे. यावर तोडगा काढून बीड शहरातल्या पथदिव्यांचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना सूचना द्याव्यात, त्याचबरोबर अडेलतट्टू भूमिकेत वागणार्‍या अधिकार्‍यांना कानमंत्र द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!