Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडपरिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांचे आडमुठे धोरण चालक - वाहकांच्या मुळावर

परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांचे आडमुठे धोरण चालक – वाहकांच्या मुळावर

मुंबईवरून आलेल्या कर्मचार्‍यांना तपासणी न करता सक्तीने केले होते रुजू ; २०० पैकी १०५ जण पॉझिटिव्ह
गेवराई (रिपोर्टर) मुंबई येथील बस सेवेसाठी बीड जिल्ह्यातल्या आगारातून पाठवण्यात आलेल्या २०० वाहक – चालकां पैकी तब्बल १०५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने वाहक-चालक अडचणीत आले असून प्रवाशांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, प्रशासनाने निगेटिव्ह आलेल्या संबंधित कर्मचार्‍यांना सेवेत हजर होण्याचा अजब फतवा काढून अकलेचे तारे तोडले असून परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांचे आडमुठे धोरण या चालक वाचकांच्या मुळावर उठले असून चालक वाहकांबरोबर प्रवाशांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबई येथील बेस्टच्या बससाठी बीड जिल्ह्यातील सर्व आगारातून वाहक व चालक यांना सात – सात दिवसासाठी पाठवण्यात येत आहे. गेवराई आगारातून ३१ ऑक्टोबरला ४४ वाहक-चालक मुंबईला सात दिवसासाठी पाठवण्यात आले होते. याच बरोबर बीड जिल्ह्यातील इतर आगारातून जवळपास दोनशे वाहक-चालक बेस्टच्या सेवेसाठी मुंबई ला पाठवण्यात आले होते. सात दिवसानंतर आलेल्या या वाहक चालकांचे कोरोना टेस्ट साठी स्वँब दिल्यानंतर २०० पैकी ८१ वाहक-चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात गेवराई आगारातील ७ जण पॉंझिटिव्ह आले होते. ७ नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातून पुन्हा दोनशे वाहक-चालक मुंबई येथील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या बेस्ट बस सेवेसाठी पाठवण्यात आले. सात दिवसानंतर आलेल्या या वाहक – चालकांनी कोरोना टेस्ट साठी स्वँब दिले. या तपासणीनंतर २०० पैकी १०५ वाहक – चालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यातील गेवराई तालुक्यातील ४४ वाहक – चालका पैकी २६ जण कोरोना पॉंझिटिव्ह आले आहेत. मुंबई येथील बेस्ट बसच्या सेवेसाठी गेलेले वाहक-चालक कोरोना पॉंझिटिव्ह येत असल्याने या बीड जिल्ह्यातील वाहक – चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मुंबई येथून आलेल्या वाहक चालकांची कोरोना चाचणी निगेटीव्ह त्यांना ताबडतोब सेवेत हजर राहण्याचे आदेश एस. टी. महामंडळाने दिल्याने त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई येथील बस सेवेसाठी गेलेल्या वाहक-चालक पॉझिटिव होत असल्याने बीड जिल्ह्यातील प्रवासाच्या आरोग्य सुद्धा धोक्यात येत आहे. ही महामारी पुन्हा बीड जिल्ह्यात वाढते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!