Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमपरळीत माथेफिरूंनी चारचाकी गाड्यांची केली नासधूस पोलिसांचे गुंडांना अभय

परळीत माथेफिरूंनी चारचाकी गाड्यांची केली नासधूस पोलिसांचे गुंडांना अभय

रात्री पेट्रोलिंग करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर):- परळी शहरातील तुळजाईनगर, कृष्णानगर, गणेशपार नगर भागात नागरिकांनी आपल्या दारासमोर लावलेल्या चारचाकी गाडीचे अज्ञात माथेफिरूंनी काचा फोडून मोठे नुकसान केले. सात ते आठ गाड्यांच्या काचा या माथेफिरूंनी फोडल्या आहेत. त्णयांना नासधूस करताना रोखणार्‍या नागरिकांनाही त्यांनी रॉडने आणि दगडाने मारहाण केल्याचे समजते. या भागात पोलीस पेट्रोलिंग करत नसल्यानेच गुंडागर्दी वाढली असून अशा गुंडांना पोलीस अभय देत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहेत.


परळी शहरातील तुळजाईनगर, कृष्णानगर, गणेशपार नगर भागात नागरिकांनी आता आपल्या चारचाकी रस्त्याच्या कडेला लावल्या असता दुचाकीवर आलेल्या अज्ञात माथेफिरूंनी रॉड आणि दगडाने चारचाकी वाहने फोडल्या. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. काचा फोडताना नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही रॉड आणि दगडाने मारहाण केल्याचे समजते. या भागात पोलीस पेट्रोलिंग करत नसल्यानेच असे प्रकार होत असून गुंडांना पोलीस अभय देतात, असा तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
0000

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!