बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचे वडिल राम विनायक गायकवाड यांचे अल्पशा आजाराने 25 मार्च रोजी निधन झाले. तृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होते.
राम विनायक गायकवाड (रा. रायमोहा ता. शिरुर) हे जिल्हा रुग्णालयात कक्ष सेवक सेवा बजावत होते. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांनी स्वईच्छा सेवानिवृत्ती घेतली होती. राम गायकवाड हे अगदी मनमिळावू स्वभावाचे म्हणून जिल्हारुग्णालयासह रायमोहा परिसरात परिचित होते. आरोग्य सेवा करतांना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले त्यामध्ये मोठा मुलगा रोहितला डॉक्टर केले तर प्रकशला जिल्हारुग्णालयात नौकरीला लावले. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावल्याने (पान 7 वर…)
त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवार दि. 25 मार्च रोजी दुपारी दोन वाजता निधन झाले. त्यांच्यावर राहयमोहा ता. शिरुर येथे रात्री सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला डॉक्टर, वकिल, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नातेवाइक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम गायकवाड यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, तिन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. गायकवाड कुटूंबीयांच्या दुखा:त दैनिक रिपोर्टर परिवार सहभागी आहे.