परळी (रिपोर्टर):- अनलॉक नंतर बाजारात गर्दी जमली आहे. परळीत पोलीस प्रशासन गुन्हेगारी पुढे हतबल आहे. शहरातील दोन ठाणे व त्यांच्या हद्दी या तांत्रिक घोळात सगळ्या घटना घुटमळत असतात.कालच्या गाड्या फोडाफोडी च्या घटना ताज्या असतानाच आजआठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.आज रोजी दुपारी १२ वा.पर्यंत पाच नागरिक तक्रार घेऊन पोलीसांपर्यंत आले आहेत. पोलीसांपर्यंत न आलेले अनेक जण आहेत. बाजारात पोलीस असतानाही जवळपास पाच जणांच्या मोबाईलवर डल्ला अज्ञात चोरट्यांनी मारला आहे.याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहे.आज आठवडी बाजारात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत