आडगावात दोन ते तीन घरे फोडले, एक ठिकाणी चोरी, धारूर, आष्टीतही चोरीच्या घटना
धारूर/बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातल्या बहुतांशी भागात भुरट्या चोरट्यांनी उच्छाद् मांडला असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात चार ते पाच घरफोडी-चोरीच्या घटना घडल्या आहेत. दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारी येथील दीपक मोरे यांचे मंगलम् ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून आतमध्ये तब्बल सव्वादोन लाख रुपयांचं सोन्याचं ऐवज चोरून नेला तर तिकडे परळी आणि धारूर तालुक्यातील गांजपूर येथेही चोरीची घटना घडली तर बीड तालुक्यातील आडगावात तीन ते चार घरे चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना एका घरात चोरी करण्यात यश आले. घटनास्थळी पिंपळनेर पोलीस डेरेदाखल झाले आहेत.
याबाबत अधिक असे की, गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील विविध भागात भुरट्या चोरट्यांनी उच्छाद् मांडून घरफोडी, चोरी, दुकानफोडी सुरू केली आहे. दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलम् ज्वेलर्स फोडून 2 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा ऐवज चोरय्यांनी चोरून नेला. तर इकडे बीड तालुक्यातील आडगावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ते चार घर फोडण्याचा प्रयत्न केला. येथील देवडकर यांच्या घरी घरफोडी करून घरामधील नगदी रोकडसह अन्य ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती होताच घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीआय भारती डेरेदाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. तिकडे परळी तालुक्यातील पांगरी येथील मदन मुंडे यांच्या घरामधून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी हरभरा, सोयाबीन, गहू भरून ठेवलेले आठ कट्टे चोरून नेले. तर तर धारूर तालुक्यातील गांजपूर येथील राधाबार्स श्रीकृष्ण डापकर यांच्या शेतातले सौरऊर्जा पंप चोरून नेला आहे. चोरट्याने धुमाकूळ घालणे सुरू ठेवल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.