आईच्या फिर्यादीवरून मुलावर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) जमीन माझ्या नावावर कर, असे म्हणत आईला काठीने गंभीर मारहाण करत तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारले तर बापाच्याही छातीत दगड मारून गंभीर जखमी केले. घरातील संसारोपयोगी वस्तूंची तोडफोड करून आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरूएन मुलावर परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनिता नरहरी मुंडे (वय 50 वर्षे, रा. लाडझरी ता. परळी) यांनी परळी ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा पंडित याने काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी ‘तुझ्या नावावरील जमीन माझ्या नावावर कर’, असे म्हणत आई सुनिता हिला मारहाण करण्यास सुरुवात केली. काठीने मारून तोंडावर लाथाबुक्क्यांनी मार दिला. या वेळी वडिलांनी धरले असता वडिलाच्या छातीत दगड मारून गंभीर जखमी केले तसेच घरातील कपाटाचे काच फोडले. चार्जींगच्या दोन बॅटरींची नासधूस केली आणि एक मोबाईलही फोडला. या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसात मुलाविरोधात 324, 427, 323, 504, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल झाला आहे.