Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडमहामारीत कर्तव्य बजावणार्‍या आशा स्वयंसेविका मानधनापासून वंचित

महामारीत कर्तव्य बजावणार्‍या आशा स्वयंसेविका मानधनापासून वंचित


कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्य करणार्‍या आशा स्वंयसेविका आजपासून संपावर

बीड (रिपोर्टर):- कोरोना काळात स्वरक्षणासाठी कुठलेही साहित्य नसतांना आशा स्वयंसेविका आणि गटप्रर्वतक यांनी गावागावात जावून सर्व्हे केला. त्यांचे रोकॉर्ड ठेवले, कोरोना लसीकरण मोहिमेत भाग घेवून ग्राऊंड लेवल काम केले. क्वारंटाईन कॅम्पमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत कर्तव्य पार पाडले. महामारीत शासनाला मोठी मदत केली मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही शासनाने मान्य न केल्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या आहेत.


कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यू दर रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम हाती घेतली होती. या कामामध्ये आशा स्वयंसेविकांचा सक्तीने समावेश करण्यात आला होता. त्यात आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जावून विविध प्रकारच्या तपासण्या केल्या. त्यांचा सर्व्हे केला, त्याचे रेकॉर्ड ठेवले, कोरोना लसीकरण कॅम्पमध्ये हजर राहून कामे केली यासह आदी जबाबदार्‍या आशा स्वयंसेविकांनी पार पाडल्या. तसेच त्या व्यतिरीक्त त्यांना नियमीतपणे नेमुण दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागली. त्यामुळे सदर कामाचा अतिरीक्त बोजा त्यांच्यावर पडला. मार्चपासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाई कॅम्प येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत डिवटी लावण्यात आली. दैनिक लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाच्या सर्व योजनाचा तसेच आशांनी केलेल्या सर्व्हेच्या कामाचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तकांना वरिष्ठ यांना सादर करावा लागला. कोरोना काळात त्यांच्याकडून कर्तव्य बजावून घेतले. मात्र १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात २ हजार रूपये व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ३ हजाराची दरमहा वाढ केलेली आहे. सदर वाढ माहे एप्रिल २०२१ पासून देण्यात आलेली नाही. ती विनाविलंब देण्यात यावी. कोव्हिड काळात कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना ३०० रूपये प्रतिदिन विशेष भत्ता द्यावा, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मोबदला दिला नाही तो देण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी महाराष्ट्रभर संप पुकारला असून आजपासून त्या बेमुदत संपावर गेल्या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!