Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडपुण्यातली नोकरी गेली, गावाकडे काम नाही नेकनूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातली नोकरी गेली, गावाकडे काम नाही नेकनूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


बीड (रिपोर्टर):- लॉकडाऊनमुळे राज्यातील लाखो कामगार बेरोजगार झाले. बेरोजगारांचा लोंढा आता ग्रामीण भागाकडे वळू लागला. मात्र ग्रामीण भागातही रोजगार नसल्याने तरुणात नैराश्ये येऊ लागले. अशाच एका 32 तरुणाने नैराश्यातून नेकनूर येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


   बाजीराव सुदाम पांचाळ (वय 32, रा. माळीगल्ली, नेकनूर) हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे येथे खासगी तत्वावर कंपनीत कामाला होता. मात्र लॉकडाऊन आणि कोरोनामुळे पुणे येथील त्याचे काम बंद पडल्याने तो गावाकडे आला होता. गावातही काम मिळत नसल्याने सदरील तरुण नैराश्येत राहत असे. याच नैराश्यातून त्याने काल आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलीस कर्मचारी वाघमारे, दीपक खांडेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकररी नेकनूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!