Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडबीड जिल्ह्यासाठी लवकरच शिक्षण विभागाकडून आयटीसी लॅबसाठी रिटेंडर 2 कोटी 10 लाख...

बीड जिल्ह्यासाठी लवकरच शिक्षण विभागाकडून आयटीसी लॅबसाठी रिटेंडर 2 कोटी 10 लाख 80 हजाराचा निधी शिक्षण विभागालाच प्राप्त


बीड (रिपोर्टर):- गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा ह्या ऑनलाईन आहेत. यावर्षीचे शैक्षणिक वर्षही ऑनलाईन क्लासद्वारे सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फॉरमेशन टेक्नालॉजी (आटीसीी) लॅब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातही 36 आयटीसी लॅब स्थापन करण्यात येणार असून या आयटीसी लॅबद्वारे इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे.
   जिल्ह्यातील 11 तालुक्यात संस्थेच्या शाळांमध्ये या आयटीसी लॅब स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सुसज्ज कॉम्प्युटर, कॅमेरा व नेटद्वारे या लॅब जोडण्यात येणार आहेत. एका लॅबसाठी 10 लाख रुपये इतकी तरतूद राज्य सरकारने समग्र शिक्षण अभियानाच्या अंतर्गत केली आहे. बीड जिल्ह्यातही या लॅबसाठी शिक्षण विभागाला 2 कोटी 10 लाख 80 हजाराचा निधी प्राप्त झालेला आहे. शिक्षण विभागाने यापुर्वीच या लॅब उभारणीसाठी टेंडर मागवले होते मात्र त्यातील अटी आणि शर्थी परिपुर्ण झालेल्या नाहीत. काही अटींमध्ये शिक्षण विभागातील लिपीकाच्या अज्ञानामुळे पुन्हा शिक्षण विभागाकडून या बाबत नव्याने मार्गदर्शन मागवून याचे रिटेंडर लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!