Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडस्विफ्ट-ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात देवडीचे ग्रामसेवक जागीच ठार

स्विफ्ट-ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात देवडीचे ग्रामसेवक जागीच ठार


स्विफ्ट गाडीचा चूराडा, आज पहाटे वडवणी नजीक घडली घटना
वडवणी (रिपोर्टर):- भरधाव वेगातील खासगी ट्रॅव्हल्सने एका स्विफ्ट गाडीला  समोरासमोर जोरदार धडक दिली . या अपघातात स्विफ्ट गाडीतील ड्रायव्हर असलेल्या ग्रामसेवकाचा जागीच मृत्यु झाला असून सदरील अपघात हा आज पहाटे वडवणी नजीक बीड परळी महामार्गावर घडला आहे.  

15
16

 
   राजेंद्र मुंडे हे सध्या हे वडवणी पंचायत समितीत कार्यरत होते . आज पहाटे ते काही कामानिमित्त कारमधून (एमएच 02 सिपी 5226 ) बीडकडे निघाले होते. ते परळी बीड रस्त्यावर वडवणी जवळ असताना पुण्यावरून परळीकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्सने (एमएच 2 9 व्ही 7227) या गाडीने कारला समोरून जोरदार धडक केली. या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!