Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमपरळी बसस्थानका समोरील दोन दुकानाला आग; लाखोचे नुकसान

परळी बसस्थानका समोरील दोन दुकानाला आग; लाखोचे नुकसान

परळी (रिपोर्टर)-परळी बसस्थानका समोरील महाराष्ट्र आप्टिकल अण्ड मोबाईल,ममता फुट वेअर हे दोन्ही दुकानाला राञी आग लागुन दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक झाल्याची घटना राञी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
शेख यासीन शेख खलील यांचे महाराष्ट्र आप्टिकल अण्ड मोबाईल यांच्या दुकानातील विविध कंपनीचे मोबाईल,ब्र्ण्डेड गागल आगीत जळुन राख झाले असुन लाखोचे नुकासान झाले असुन सय्यद शरिफ सय्यद यांच्या मालकीचे ममता फुट वेअर मधील चप्पल,बुट अदी साहित्य जळाले आहे.नगर परिषद व थर्मल पावर स्टेशनच्या अग्निशामक बंबला ही पाचारण करण्यात आले होते हे बंब घटनास्थळी पोहचे पर्यंत हे दोन्ही दुकाने जळुन खाक झाली होती.माञ पुढील दुकानांना आग लागण्याच्या आतच नियंत्रित करण्यात यश आले आहे.ही आग प्राथमिक माहिती नुसार शाटसर्टिक झाल्याने लागली असावी असे बोलले जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!