Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाऑनलाईनच्या भानगडीत पुस्तकं मिळणार की नाही? जिल्हा पातळीवर अद्यापही तरी पुस्तकं आली...

ऑनलाईनच्या भानगडीत पुस्तकं मिळणार की नाही? जिल्हा पातळीवर अद्यापही तरी पुस्तकं आली नाहीत


बीड (रिपोर्टर):- कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा ऑनलाईन आहेत. या ऑनलाईनच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तितकाच परीणाम झाला. सगळ्याच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण पद्धत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा लाभ घेता येत नाही. यंदा तरी शाळा सुरळीत सुरू होईल असं वाटत होतं मात्र शाळा सुरू होण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. ऑनलाईनच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पुस्तकंही मिळाले नाहीत. पुस्तक मिळणार की नाही याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जिल्हा पातळीवर अजुन तरी पुस्तकाचं वितरण झालं नाही.
गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि तेंव्हापासून ते आजपर्यंत कधी बंद, कधी सुरू अशा पद्धतीने आजपर्यंत कारभार होत आला. या लॉकडाऊनच्या कार्यकाळात शिक्षणाचे मोठे नुकसान झाले. शाळा भरवण्याऐवजी शासनाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. या ऑनलाईन प्रक्रियेचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही. काही ठरावीक विद्यार्थ्यांच्या पालकाकडे अँड्रॉईड मोबाईल असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचत. ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा ज्यांच्याकडे साधा मोबाईल आहे त्यांच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाबाबत कसलाही गंध नाही. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल असं वाटत असतांना कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे व्यवस्था पुन्हा मोडकळीस आली. त्यामुळे राज्य सरकारने अद्यापपर्यंत शाळा उघडण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होत असते. आणि पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप होत असते. यंदा ना शाळा सुरू झाली ना पुस्तकाचे वाटप झाले. ऑनलाईनवरच अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ऑनलाईन अभ्यास क्रम सुरू असला तरी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे तरी वाटप व्हायला हवे. मात्र जिल्हा पातळीवर अजुन तरी पुस्तक आलेली नाही. पुस्तकाची मागणी केली का नाही हा ही प्रश्‍नच आहे. मागणी केली असती तर अद्यापपर्यंत पुस्तकाचा पुरवठा झाला असता. इथुन पुढे मागणी केली तर पुस्तके येण्यासाठी दीड ते दोन महिण्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत विद्यार्थी विना पुस्तकाचा अभ्यास करावा लागणार की काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!