Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाचे नियमांचे पालन करून शेतकर्‍यांना भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जागा

कोरोनाचे नियमांचे पालन करून शेतकर्‍यांना भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जागा

किल्ले धारुर( रिपोर्टर) धारूर शहरातली बाजार हा बाजार तळावर न भरता इतर ठिकाणी अस्वच्छ ठिकाणी भरत होता याबाबत दैनिक रिपोर्टर मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते याची दखल आज धारूर नगरपरिषदेने घेतली आहे आणि बाजार पुन्हा पूर्वीच्याच बाजार तळाच्या जागी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून शेतकर्‍यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे
धारुर शहरातील बाजार हा गजानन शॉपिंग सेंटर जवळील पोस्ट कार्यालयाच्या समोर अस्वच्छ जागी भरत होता या ठिकाणी कचरा टाकला जातो डुकरे असतात अतिशय अस्वच्छ जागा आहे सर बाजार रस्त्यावरच भरत असल्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणात अडचण होत होती छोट्याशा जागेत भरत असल्यामुळे गर्दी होऊन कोरोणाला आमंत्रण होण्याची भीती होती.


याबाबत दैनिक रिपोर्टर तसेच इतर वृत्तपत्रांमध्ये ही वृत्त प्रकाशित झाले होते सामाजिक कार्यकर्ते, तसेच सामाजिक संस्था यांनीही धारूर नगर परिषदेकडे बाजारा हा बाजार तळावर भरवावा अशी मागणी केली होती वृत्तपत्रातील बातम्या तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी यावरून धारूर नगरपरिषदेने आज शुक्रवारचा बाजार इतर ठिकाणी रस्त्यावर अस्वच्छ जागी न भरवता बाजार तळावरती असलेल्या मोठ्या जागेमध्ये भरवला आहे यामुळे सामाजिक कार्यकर्ते धारूर शहरातील नागरिक ,सामाजिक संस्था, पत्रकार यांनी नगरपरिषदेचे आभार मानले आहे शेतकर्‍यांनीही यातून समाधान व्यक्त केले आहे तेथे मोकळी जागा असल्याने नागरिकही कोरोणाच्या नियमांचे पालन करून भाजीपाला खरेदी करताना दिसून येत आहेत.\
शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस अडचण होत होती यामुळे पूर्वीच्या जागी मोकळ्या मैदानात कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करून तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाने दिलेल्या वेळेतच भाजीपाला विक्रीसाठी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून आज जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकर्‍यांनी गर्दी करू नये कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाजीपाला विक्री करावा.
-सचिन डावकर, नोडल ऑफिसर नगरपरिषद धारूर

शेतकर्‍यांना भाजीपाला विक्रीसाठी बाजार तळाच्या मोकळ्या मैदानावर कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करून नगरपरिषदेने आज सोशल डिस्टंसिंग चे पालन करून जागा उपलब्ध करून दिली यामुळे नागरिक तसेच शेतकरी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही नेहमीच याच ठिकाणी नगरपरिषदेने शेतकर्‍यांना जागा उपलब्ध करून द्यावी शहरात इतरत्र भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात येऊ नये.
-सुनील गैबी, शहराध्यक्ष राजमुद्रा संघटना

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!