मुंबई (रिपोर्टर) बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनिल धांडे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची बीडसाठी मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून प्रा. धांडे यांची लोकसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे प्रा. सुनिल धांडे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काही काळ कार्यरत राहिलेले आहेत. या काळात त्यांनी अनेक आंदोलने केली. त्याचबरोबर धांडे यांची पायी दिंडी कायम चर्चेत असायची. धांडेंच्या कार्यकाळामध्ये बीडमध्ये शिवसेना आक्रमक राहिली त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघाचे त्यांना नेतृत्व करता आले. मधल्या काही काळात प्रा. धांडे यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्याइरादे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज सुनिल धांडे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून प्रा. सुनिल धांडे यांची बीड लोकसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.