Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमनगरपालिकेसमोरील स्वीट होमचे दुकान फोडले सीसीटीव्हीत चोरटा झाला कैद

नगरपालिकेसमोरील स्वीट होमचे दुकान फोडले सीसीटीव्हीत चोरटा झाला कैद

बीड (रिपोर्टर)- नगरपालिकासमोर असलेल्या एका स्वीट होमच्या दुकानाचे बनावट चावीने कुलूप उघडून नगदी दहा हजार रुपये चोरून नेल्याची घटना रात्री घडली. सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने नगदी दहा हजार रुपये पळविले. दुकानात सीसीटीही कॅमेरा असल्याने चोरटा स्पष्टपणे दिसून येत आहे.
नगरपालिकेसमोर भंवरलाल परमार यांचे महादेव स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. रात्री एका चोरट्याने दुकानाचे कुलूप बनावट चावीने उघडून आतील नगदी दहा हजार रुपये चोरून नेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी परमार आले असता त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्याला कळविले. त्यानुसार ठाण्याचे गांधले यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने या कॅमेर्‍यात सदरील चोरटा कैद झाला असून त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत आहे. या चोरट्याचा शोध बीड पोलिस घेत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!