Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमआष्टी तालुक्यातील मातावळीच्या डोंगरात आढळला मृत बिबट्या; वनविभाग घटनास्थळी

आष्टी तालुक्यातील मातावळीच्या डोंगरात आढळला मृत बिबट्या; वनविभाग घटनास्थळी


आष्टी(रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील मातावळी परिसरातील डोंगराच्या दरीत वयोवृद्ध बिबट्या मृत कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना शुक्रवार दि.१८ रोजी समोर आली आहे.बिबट्याचा मागिल १ महिन्यापूर्वी मृत्यू झाला असावा कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृत देह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी वनविभागाचे पथक फौज-फाटा घेऊन दाखल झाले आहेत.

ashti1


तालुक्यातील मातावळीच्या डोंगरामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याने मृत कुजलेल्या अवस्थेत असलेला बिबट्याचे मुंडके(शिर),जबडा,हाडे आणि कातडी पाहली.याची माहिती आष्टी वनविभागाला दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असता तो बिबट महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याचे तसेच तो वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा दावा वनविभाग अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केला आहे.तालुक्यात डोंगराळ भाग जास्त असल्याने बिबट्याची संख्या जास्त आहे असे बोलले जात आहे.मागील काही दिवसापूर्वी बिबट्याची दहशत संपुर्ण तालुक्यात आहे.मात्र, हे बिबटे माणसावर हल्ला करत नाहीत. मात्र बिबट्याचा वावर आहे. असे वनविभागाकडून बोलले जात आहे.त्यात हा प्रकार आष्टी-पाटोदा सीमेवर असलेल्या मातावळी डोंगरात समोर आला आहे.अजूनही एका बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे असे वनविभागाकडून बोलले जात आहे.घटनास्थळी वनविभागाने धाव घेतली असून वरिष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर व टीमला पाचारण केले असून बिबट्याचा मृत्यू कश्याने झाला असेल ते वैद्यकीय अहवालातच समोर येईल अशी माहिती आष्टी तालुका वनविभाग अधिकारी श्याम शिरसाठ यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!