तीन पॅनल निवडणूक रिंगणात
केज (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी या निवडणुकीमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे. केज येथी बाजार समिती स्थापनेपासून आडसकरांच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत मात्र आडसकरांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पॅनल उभे केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे.
बाजार समितीच्या निवडणुका स्थानीक नेत्यांसाठी महत्वपुर्ण मानल्या जातात. अनेक बाजार समित्या प्रस्थापीत पुढार्यांच्या अनेक वर्षापासून ताब्यात आहेत. काही ठिकाणी या बाजार समित्यांच्या निवडणुकीत चुरस पहावयास मिळणार आहे. केज बाजार समिती स्थापनेपासून रमेश आडसकर यांच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आडसकर असे तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख असून राष्ट्रवादी आणि आडसकर यांच्यामध्ये खरी लढत असल्याचे दिसून येऊ लागले. राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे, भाजपाकडून रमेश आडसकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रांजणकर यांनी पॅनल उभे केलेले आहेत. दरम्यान आडसकर यांच्याकडील बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे प्रयत्न करणार तर बाजार समिती आपल्या हातातून जाऊ नये यासाठी रमेश आडसकर हे आतापासूनच जोमाने कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसची नेमकी भूमिका काय हे अद्याप तरी समोर आलेले नाही.