Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाने होमगार्डचा मृत्यू बीड ग्रामीण पोलिसांनी माणुसकी दाखवत केली लाख मोलाची मदत

कोरोनाने होमगार्डचा मृत्यू बीड ग्रामीण पोलिसांनी माणुसकी दाखवत केली लाख मोलाची मदत


पोलिसांपाठोपाठ होमगार्डांना शासनाच्या ५० लाखांचे विमा कवच द्या
बीड (रिपोर्टर):- पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी होमगार्ड रात्रंदिवस कर्तव्य बजावतात. पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना शासन ५० लाखांची मदत देतं मात्र होमगार्डांना कसलाच विमा मिळत नाही. बीड जिल्ह्यातील दोन होमगार्ड कर्तव्यावर असताना कोरोनाने मृत्यू पावले आहेत. त्यात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कुंभारकर नावाचा एक होमगार्ड मृत्यू पावला असून त्यांच्या कुटुंबियांना बीड ग्रामीण पोलिसांनी लाख मोलाची मदत केली आहे.


बीड जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस रस्त्यावर उतरत आहे. कोरोना काळात डयुटी बजावत असताना ज्या पोलीस कर्मचार्‍याला कोरोना झाला त्याला उपचारासाठी आणि मृत्यू झाला
तर शासन विम्यापोटी ५० लाखांची मदत करतात. मात्र त्यांच्याच खांद्याला खांदा लावून होमगार्ड आपले कर्तव्य बजावतात. कर्तव्य बजावताना त्यांच्या एक पाऊल पुढे होमगार्ड असतात. मात्र शासनाने होमगार्डांना विमा कवच दिले नसल्याने बीड जिल्ह्यातील शेकडो होमगार्ड विना विमा कवच कोरोना ड्युटी बजावतात. कोरोना ड्युटी करताना अनेक होमगार्डांना कोरोना झाला मात्र त्यांनी त्यावर यशस्वी मात केली. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील होमगार्ड नागेश वसंतराव कुंभारकर (वय ४८, रा. चर्‍हाटा) यांना २० मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. २४ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. कोरोनामुळे घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. शासनाकडून त्यांना एक रुपयाचीही मदत दिली जात नसल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे, पीएसआय पवन राजपूत आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी पुढे येऊन कुंभारकर यांच्या पत्नीस ७१ हजाराची रोख मदत केली.

Most Popular

error: Content is protected !!