Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडभाजी विक्रेत्या महिलांचा कलेक्टर कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार्‍या महिलांना पोलिसांनी दिले हाकलून

भाजी विक्रेत्या महिलांचा कलेक्टर कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार्‍या महिलांना पोलिसांनी दिले हाकलून

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शनिवार, रविवार वगळता जिलह्यात ढिल देण्यात आली आहे. आज बंद असताना आडत मार्केट सुरू होते. आडतमधून भाजीपाला विक्रेत्या महिलांनी भाजीपाला खरेदी केला आणि त्या विक्रीसाठी रस्त्यावर बसल्या असता पोलिसांनी त्यांना उठून लावले. त्यामुळे आम्ही खरेदी केलेला भाजीपाला आम्हाला विकू द्या, असे म्हणत महिलांनी कलेक्टर कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. मात्र पोलिसांनी त्यांना हाकलून लावले.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कमतीक मी गर्दी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. शनिवार-रविवार वगळता खरेदी-विक्रीसाठी ढिल देण्यात आली आहे. मात्र आज शनिवारी बंद असतानाही आडत मार्केट सुरू होते. या आडत मार्केटमधून शहरात भाजीपाला विकणार्‍या महिलांनी भाजीपाला खरेदी केला. त्या विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसल्या असता पोलिसांनी त्यांना उठवून लावले. त्यामुळे त्यांनी कलेक्टर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले मात्र तेथूनही त्यांना पोलिसांनी हाकलून दिले. आज शनिवारी बंद होता तर आडत मार्केट सुरू का ठेवले? असा सवाल महिलांनी पोलिसांना केला आणि आम्ही खरेदी केलेला भाजीपाला आज आम्हाला विकू द्या, अशी विनंतीही केली मात्र पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांना हाकलून दिले.

Most Popular

error: Content is protected !!