Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeखेळमिल्खा हे नाव नेहमीच प्रेरणेसाठी ओळखले जाईल; क्रीडा विश्व हळहळले

मिल्खा हे नाव नेहमीच प्रेरणेसाठी ओळखले जाईल; क्रीडा विश्व हळहळले

काही दिवसांपूर्वीच मिल्खा सिंह यांच्या पत्नीचे करोनाने निधन झाले होते

१९५९मध्ये मिल्खा सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंह यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंह यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिल्खा सिंह यांच्या निधनानंतर क्रीडा जगताने श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली. सेहवागने ट्विटमध्ये ते धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक होते असे म्हटले आहे. महान व्यक्ती मिल्का सिंह जी आपले शरीर सोडून गेले आहेत, पण मात्र मिल्खा सिंह हे नाव धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक म्हणून सदैव स्मरणात राहील, असे सेहवागने म्हटले आहे.

धावपटू पीटी उषा यांनी देखील मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट केले आहे. पीटी उषा यांनी मिल्खा सिंह यांच्यासोबत प्रशिक्षणादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे.

माझी प्रेरणा मिल्खा सिंहजी यांच्या निधनाने दु: खाचे गडद ढग कायम आहेत. त्यांच्या निर्धार आणि परिश्रमच्या या कथेतून लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आणि ती अजूनही सुरूच आहे असे पीटी उषा यांनी म्हटले आहे.

अॅथलेटि अंजू बॉबी जॉर्ज यांनी देखील मिल्खा सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अॅथलेटि जगताचे मोठे आज मोठे नुकसाना झाले आहे असे त्यांनी म्हटले


केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे हे मिल्खा सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल म्हणाली आणि माजी भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गेल्या महिन्यात झाली करोनाची लागण

गेल्या महिन्यात मिल्खा सिंह यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर (PGIMER) चंदीगडमध्ये  दाखल केले गेले.

मिल्खा सिंह यांचे विक्रम

मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि  ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंह यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंह यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!