Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडपरळीनांदायला का येत नाहीस? म्हणत पत्नीचा गळा चिरून खून

नांदायला का येत नाहीस? म्हणत पत्नीचा गळा चिरून खून


खून केल्यानंतर आरोपीने विष पिऊन आत्महत्येचा केला प्रयत्न
बीड (रिपोर्टर)- गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने १६ नोव्हेंबर रोजी पती ज्ञानेश्‍वर ऊर्फ योगीराज सोनवर याने सासरवाडीला जावून ‘तू गेल्या दोन महिन्यांपासून नांदायला का येत नाहीस?’ म्हणून तिच्या गळ्यावर कत्तीने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोधेगाव येथे घडली. दरम्यान पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला नातेवाईकांनी अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी मयत ज्ञानेश्‍वरी धनराज ऊर्फ योगीराज सोनवर हिची बहीण कल्पना ऊर्फ छकुली शामराव सोडगीर (वय २४ वर्षे) हिने सिरसाळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता धनराज ऊर्फ योगीराज वनराज सोनवर (रा. होळ ता. केज) हा फिर्यादी छकुली सोडगीर यांच्या घरी म्हणजेच बोधेगाव (ता. परळी) येथे आला व ज्ञानेश्‍वरी हिला म्हणाला की, तू गेल्या दोन महिन्यांपासून नांदायला का येत नाहीस असे म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातात असलेल्या कत्तीने ज्ञानेश्‍वरीच्या गळ्यावर व मानेवर वार करून तिला ठार मारले. यानंतर त्याने स्वत: विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पीआय डोंगरे, पीएसआय जनकपुरी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी धनराज योगीराज सोनवर याच्या विरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात कलम ३०२, ४५२, ५०४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!