Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी होईना आज १५५ पॉझिटिव्ह

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी होईना आज १५५ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी पॉझिटिव्ह रेट दहाच्या खाली यायला तयार नाही. आज बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १४.९९ टक्के आहे. त्यामुळे बीडकरांना आहे तेच निर्बंध लागू राहणार आहेत. आज आरोग्य विभागाला ४ हजार २२४ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये १५५ जण बाधित आढळून आले तर ४ हजार ६९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.


आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोनाने २ हजार ४५३ जणांचा बळी घेतला आहे. मागील चोवीस तासात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १४.९९ टक्के तर डेथ रेट २.७० टक्के आहे. रिकव्हरी रेट वाढला असून तो ९५.८५ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण ९० हजार ५२१ जणांना कोरोना झाला असून त्यातील ८६ हजार ७७३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. आरोग्य विभागाला आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये अंबाजोगाईत ८ पॉझिटिव्ह, आष्टी २५, बीड ३४, धारूर ६, गेवराई १५, केज २३, माजलगाव १५, परळी ४, पाटोदा ६, शिरूर ९ आणि वडवणी तालुक्यात १० रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!