आष्टी ( रिपोर्टर):-तालुक्यातील देविनिमगांव येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अचानक हृदय-विकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली.मृत तरुणाचे नाव संकेत उर्फ (सोन्या)पोपळे असे आहे.
तालुक्यातील देविनिमगांव येथील संकेत उर्फ सोन्या बिटु पोपळे वय वर्ष 25 या तरुणाला मंगळवारी दि.4 एप्रिल रोजी पहाटे 6 च्या दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला उपचारासाठी अहमदनगर येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला अहमदनगर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करुन दुपारी देविनिमगांव या गावी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.माजी सरपंच दत्तात्रय बिटु पोपळे यांचे ते चिरंजीव होते.मयत संकेत याचा विवाह अवघ्या 5 ते 6 महिन्यापूर्वी झाला होता.या घटनेने देविनिमगांवात हळहळ व्यक्त होत आहे.