Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeशेतीबीड जिल्ह्यात तिन टक्के पेरण्या काही ठिकाणी ओलं तर काही ठिकाणी पडली...

बीड जिल्ह्यात तिन टक्के पेरण्या काही ठिकाणी ओलं तर काही ठिकाणी पडली कोरड

रासायनिक खतासह सोयाबीनच्या बियाणांची चढ्या भावाने विक्री
बीड (रिपोर्टर)ः- जून महिन्यामध्ये चांगला पाऊस पडला. पाऊस झाल्याने शेतकर्‍यांने बि-बियाणे खरेदी करुन पेरणीला सुरूवात केली. आज स्थितीत जिल्ह्यात तिन ते साडेतिन टक्के पेरण्या झाल्या. जिल्ह्यातील काही भागात पेरणी योग्य ओल आहे तर काही ठिकाणी मात्र कोरड पडली. गेवराईसह अन्य भागामध्ये लागवड झाल्यानंतर पाऊस झाल्या नसल्याने तेथील शेतकरी पावसाची वाट पाहू लागले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नामांकीत बियाणंसह रासायनीक खताचा तुटवडा दाखवत काही व्यापारी शेतकर्‍यांची आर्थीक लूट करत असल्याचे दिसून येत आहे.


गेल्या वर्षापासून पाऊस चांगला साथ देवू लागला. त्यामुळे कृषी उत्पन्नात मोठी वाढ झाली. यावर्षी मान्सुनने जून महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पाऊस पडल्यानंतर शेतकर्‍यांने बि-बियाणंसह रासायनीक खते खरेदी करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत जिल्ह्यात तिन ते साडेतिन टक्यापर्यंत पेरणी झाली. जिल्ह्याचं खरीपाचं क्षेत्र आठ लाख हेक्टरपर्यंत आहे. यात चार ते साडे चार लाखापर्यंत कापसाची तर दोन ते अडिच लाखापर्यंत सोयाबीनची लागवड होते. मात्र यंदा सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ होणार आहे. गेल्यावर्षी सोयबीनला शेवटच्या टप्यात चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांचा जास्तीत कल सोयाबीन लागवडीकडे वळू लागला. बाजारात सोेयाबीनचे बियाणे विविध कंपनीचे असले तरी महाबीजच्या बियाणाला शेतकर्‍यांची पसंती असल्याने या बियाणाचा तुटवडा दाखवत काही दुकानदार शेतकर्‍यांची लूट करु लागले. कापसाच्या बियाणां बाबतीत तसंच आहे. रासायनीक खताचाही तुटवडा दाखवून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याचे प्रकार बहुंताश ठिकाणी घडू लागले. शेतकर्‍यांची लूट होवू नये यासाठी कृषी विभाग नजर ठेवून असलं तरी कृषी विभागाला शेतकर्‍यांचं देणं घेणं नसल्याचं दिसून येत आहे.कारण आजपर्यंत एकाही दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई केलेली नाही. लागवड अजूनही सुरूच आहे. काही ठिकाणी लागवडी योग्य ओल आहे तर गेवराईसह अन्य भागामध्ये लागवड झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने तेथील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!