बीड (रिपोर्टर) रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात. वैयक्तिक लाभाच्या योजना रोहयोमधून राबविल्या जात आहेत. बीड पंचायत समितीसह इतर तालुक्यातील ऑपरेटरांनी काही शेतकर्यांच्या वैयक्तिक योजना सार्वजनकमध्ये टाकल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या घोळामुळे फळबागवाल्या शेतकर्यांचे रोहयोचे पैसे अडकून पडले आहे. सार्वजनिकमधून वैयक्तिकमध्ये आणण्यासाठी अजून कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. पं.स. स्तरावर फक्त मार्गदर्शन मागवलं आहे, असं सांगितलं जात आहे. याकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात. वैयक्तिक योजनासुद्धा रोहयोतून राबविल्या जातात. शेतकर्यांना आर्थिक लाभ व्हावा, त्यांची प्रगती व्हावी त्यासाठी फळबाग, सिंचन विहिरी, शेततलाव इत्यादी योजना राबविल्या जातात. या योजना राबवित असताना बीड पंचायत समितीसह इतर तालुक्याच्या ऑपरेटरांनी वर्कऑर्डर काढताना काही घोडचुका केल्या. वैयक्तिक योजना सार्वजनिकमध्या टाकल्या. जेणेकरून वैयक्तिक योजना या वैयक्तिकमध्येच असायला पाहिजे. मध्यंतरी रोहयो विभागाने मजुरांचे दोनवेळा फोटो काढण्याचे आदेश दिलेले होते. या आदेशामुळे ग्रामरोजगार सेवक संघटनांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून रोहयो मंत्र्यांनी आदेश परत घेतला आणि पुर्वीप्रमाणे बिलं काढण्याचे आदेश दिले. मात्र ज्या शेतकर्यांच्या योजना सार्वजनिकमध्ये पडलेल्या आहेत त्या शेतकर्यांना अडचणी येऊ लागल्या. त्यांची बिलं निघेना गेले. यासंदर्भात अजून कुठलाही तोडगा निघाला नाही. पंचायत समिती कार्यालय अंतर्गत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मार्गदर्शन मागविले आहे असे सांगितले जात आहे. याबाबत जिल्ह्याच्या रोहयो विभागाचे प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून याबाबत तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.