Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडट्रकच्या धडकेने एक जण ठार ,रस्ता खोदून ठेवल्याने झाला अपघात

ट्रकच्या धडकेने एक जण ठार ,रस्ता खोदून ठेवल्याने झाला अपघात

चार महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी

नेकनूर (रिपोर्टर):- भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने पायी जाणार्‍या एका व्यक्तीस जोराची धडक दिल्याने सदरील व्यक्ती जागीच ठार झाला. ही घटना रात्री नेकनूर जवळ घडली. सदरील हा अपघात रस्ता खोदून ठेवल्यामुळेच झाला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार महिन्यापासून एसपी कंपनीच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अद्यापही मार्गी लागलेले नसून यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. याला सर्वस्वी कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे.

संजय मारुती राऊत (वय 43, रा. कानडीमाडी ता. केज) हे रात्री 9 वा. नेकनूर जवळ रस्त्याने पायी जात असताना त्यांना पोकलेन घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम.एच. 16 ए.वाय. 5533) ने ाजेराची धडक दिली. या अपघातात संजय राऊत हे गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाले. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलीस कर्मचारी भाऊ वाघमारे, दीपक खांडेकर, सुशांत सोनवणे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. हा अपघात रस्ता खोदून ठेवल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवण्यात आला मात्र याचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. आतापर्यंत नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. रात्री झालेल्या अपघाताला एसपी कंपनी जबाबदार असून सदरील कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!