Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeव्यापारटेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती मार्क झुकरबर्गला मागे टाकत

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती मार्क झुकरबर्गला मागे टाकत

मुंबई : कोरोना महामारीमुळे एकीकडे अनेक व्यवसायांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तसेच दुसरीकडे अनेक व्यवसायांना याचा फायदा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अनेक कंपन्या अशा आहेत, ज्यांना टाळं लावावं लागलं आहे. अशातच स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, एलन मस्क आता जगभरातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

एसएंडपीच्या 500 कंपन्यांच्या यादीत सहभागी झाली टेस्ला

इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला एसएंडपी 500 कंपन्यांच्या यादीमध्ये सहभागी करण्यात आलं आहे. दरम्यान, एलन मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं आहे. त्यानंतर एकाच दिवसांत एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये 7.61 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त मस्क यांच्या वार्षिक संपत्तीमध्ये आतापर्यंत 82 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

एकाच वर्षातील मालमत्तेतली सर्वात मोठी वाढ

वार्षिक संपत्तीमध्ये वाढ झाल्यासंदर्भात बोलायचे झाले तर या यादीत मस्क यांचं नाव सर्वात पहिलं येतं. मस्क यांच्या संपत्तीमध्ये 500 श्रीमंत व्यक्तींच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. तसेच एलन मस्क यांच्यानंतर दुसरं नाव अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आहेत. ज्यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी जवळपास 70 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!