Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईमदोन हजाराची लाच घेताना दोन पोलीस रंगेहाथ पकडले, उस्मानाबादच्या एसीबीने सिरसाळा ठाण्यात...

दोन हजाराची लाच घेताना दोन पोलीस रंगेहाथ पकडले, उस्मानाबादच्या एसीबीने सिरसाळा ठाण्यात केली कारवाई

सिरसाळा (रिपोर्टर): राखेचा टिप्पर सोडण्यासाठी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन लाचखोर कर्मचार्‍यांनी संबंधीताकडे लाचेची मागणी केली होती. यात दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. दोन हजार रुपये घेताना दोन कर्मचार्‍यांना उस्मानाबद लाचलूचपत विभागाच्या कर्मचार्‍यांनी रंगेहाथ पकडले. गेल्या काही दिवसांपूर्वी सिरसाळा पोलीसांनी राखेचा टिप्पर पकडला होता. हा टिप्पर सोडण्यासाठी पोलीस कर्मचारी येरडलवार व उमेश कंकनवार या दोघाने संबंधीताकडे लाचेची मागणी केली होती. यात दोन हजार रुपये तडजोड झाली होती. मात्र संबंधीत टिप्पर चालकाने उस्मानाबाद लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती. आज दुपारी पैसे स्विकारताना येरडवार व उमेश कंकनवार या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरील या कारवाईने लाचखोर कर्मचार्‍यात एकच खळबळ उडाली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!