Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडव्याजमुक्तीचा डांगोरा, बँकांकडून सक्तीने व्याज वसुली, 3 लाखांचे सोडा इथं पाच-पन्नास हजाराचेही...

व्याजमुक्तीचा डांगोरा, बँकांकडून सक्तीने व्याज वसुली, 3 लाखांचे सोडा इथं पाच-पन्नास हजाराचेही व्याज घेतले जाते

सरकारची घोषणा फसवी की बँकेची दादागिरी; शेतकर्‍यात संताप

बीड (रिपोर्टर):- मुदतीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 1 लाखाची नव्हे तर 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा डांगोरा राज्यातील ठाकरे सरकारने पिटवला असला तरी एक लाखापर्यंत मुदतीत कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांकडून बीड जिल्ह्यातील सर्वच बँका व्याज घेत असल्याचे समोर आले आहे. एखाद्या शेतकर्‍याने 20 हजाराचे कर्ज घेतले असले तरी बँका त्यावर व्याज घेत असून बिनव्याजी कर्जाचा डांगोरा पिटवणार्‍या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला या बँका शेतकर्‍यांसमोर तोंडघशी पाडत आहेत. एकीकडे सरकार बिनव्याजी कर्ज म्हणते तर दुसरीकडे बँका मात्र सावकारस्थित होत व्याज घेत असल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. मुदतीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना आतापर्यंत एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात होते मात्र मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिककर्ज मर्यादा तीन लाखापर्यंत वाढवल्याची घोषणा केली अन् तसं अर्थसंकल्पीय भाषणात याची घोषणा केली. मंत्रिमंडळात मंजूरीही झाली परंतु प्रत्यक्षात या वर्षी जेव्हा बीड जिल्ह्यातले मुदतीत कर्जफेड करणारे शेतकरी बँकांमध्ये गेले तेव्हा एक लाखापर्यंतच्या कर्जावरही प्रत्येक बँकेने व्याज घेतले. एक लाखाचे व्याजापोटी 7 हजार रुपये शेतकर्‍यांना भरावे लागले. ज्या शेतकर्‍यांनी 20 किवा 50 हजार रुपये घेतले त्यांनाही त्या रकमेवरचे व्याज भरावे लागले. शेतकर्‍यांनी जेव्हा शासनाची बिनव्याजी कर्जाची योजना बँक अधिकार्‍यांना सांगितली तेव्हा बँक अधिकार्‍यांनी कानावर हात ठेवत सरकार आम्हाला व्याज देत नाही त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कर्जावरचे व्याज द्यावेच लागेल, असे म्हणत सक्तीने मूळ रकमेसह व्याज वसूल करण्यात आले आणि अजूनही करण्यात येत आहे. अगोदर एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जायचे ते तीन लाखापर्यंत ठाकरे सरकारने नेले यामुळे शेतकरी काही प्रमाणात आनंदी झाले परंतु प्रत्यक्षात जेव्हा एक लाखावरच व्याज भरावे लागले तेव्हा शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे घोषणा करायच्या, शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज दिल्याचा डांगोरा पिटवायचा, दुसरीकडे बँका मात्र सावकारासारखी व्याज वसुली करत असल्याने सरकारच्या वांझोट्या घोषणांवर संताप व्यक्त होत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या कर्जात कपात एकीकडे 1 लाखावरचे बिनव्याजी कर्ज तीन लाखांपर्यंत वाढवल्याचे राज्य सरकार सांगते. परंतु प्रत्यक्षात बँका एक लाखापर्यंतच्या रकमेवरच व्याज घेते. दुसरीकडे तीनलाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याबाबत राज्य सरकार भुषानाने सांगते परंतु प्रत्यक्षात बँका शेतकर्‍यांना पहिले घेतलेल्या कर्जामध्येच दहा-पाच रुपये कमी करत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!