Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeबीडपावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली काही शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या तर काहींच्या खोळंबल्या

पावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली काही शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या तर काहींच्या खोळंबल्या


बीड (रिपोर्टर):- जून महिन्यामध्ये बीड जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकर्‍यांनी विविध पिकांची लागवड केली मात्र गेल्या दहा – बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना ढगाकडे पाहण्याची वेळ आली. जिल्ह्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या तर काही पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र जवळपास आठ लाख हेक्टर इतका आहे. त्यामध्ये तीन ते साडे तिन टक्के पेरण्या झाल्या आहेत.


गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी जून महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची मशागत करत पेरणी करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तीन ते साडेतीन टक्के इतक्या क्षेत्रात लागवड झाली. जिल्ह्यात ८ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी होत असते. त्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना महत्व देत शेतकरी या दोन्ही पिकांची जास्तीत जास्त लागवड करत आहेत. जूनमध्ये पडलेल्या पावसामुळे ओल चांगली असल्याने शेतकर्‍यांनी लागवड केली मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांना ढगाकडे पाहण्याची वेळ आली. पावसाअभावी काही पेरण्या खोळंबून पडलेल्या आहेत. चांगला पाऊस पडल्यानंतरच आता इतर शेतकरी पेरणी करणार असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!