जलजीवन मिशन अंतर्गत गर्देवाडी येथील 85 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजना
व आरोग्य उपकेंद्राच्या कामाचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ
परळी (रिपोर्टर) गर्देवाडी गावाच्या आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे. गर्देवाडीत आल्यावर स्व. मुंडे साहेब व व स्व. पंडित अण्णांचे सहकारी स्व. गोपीनाथराव पवार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पवारांची तिसरी पिढी आज मुंडे परिवारासोबत आहे, याचा आनंद व अभिमान आहे, हे गाव आणि संपूर्ण मतदारसंघात विकासकामे खेचून आणू, असे मत माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत परळी वैद्यनाथ तालुक्यातील मौजे गर्देवाडी येथील 85 लाख रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे तसेच आरोग्य उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचे आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. जलजीवन मिशन अंतर्गत आ.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा योजनेची शेकडो गावांमध्ये सुरुवात केली आहे. सामान्य माणसाच्या विकासासाठी ग्रामीण भगत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न असून, सत्ता असो किंवा नसो, तरीही निधीची कुठेही कमतरता भासू देणार नाही, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले. संबंधित पाणी पुरवठा योजनेतील पाण्याची टाकी बांधण्यासाठी भागूराम गडदे यांनी तर आरोग्य उपकेंद्र उभारणीसाठी विठ्ठल गडदे यांनी स्वतःची जमीन उपलब्ध करून दिली असून, या उभयतांचे धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान कौतुक केले आहे. यावेळी मा.आ.संजयभाऊ दौंड, माजी जिल्हाधिकारी बळीरामकाका पवार, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, ऍड.विष्णुपंत सोळंके, भागवत बप्पा देशमुख, सूर्यभान नाना मुंडे, राजाभाऊ पौळ, गर्देवाडीचे सरपंच सुशांत पवार, विष्णुपंत देशमुख, पिंटू मुंडे, सुनील पवार, माऊली तात्या गडदे, विनायक राठोड, बाबुराव राठोड, विजय राठोड, वसंतराव राठोड, सतीश सलगर, मनोहर केदार, निळकंठ गडदे, शेषेराव गडदे, सुरेश दराडे, पांडू तात्या शेप, श्री. बनसोडे, राजाभाऊ राठोड, नमाजी गडदे, भागुराम गडदे, विठ्ठल गडदे, रमेश राठोड, विलास गडदे आदी उपस्थित होते.