Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज १५१ पॉझिटिव्ह

आज १५१ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- लॉकडाऊनमधून बीडकरांना सूट देण्यात आली असून सध्या बीड जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. ती शंभर ते दोनशेच्या आसपास असून आज आलेल्या अहवालात १५१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कमी अंबाजोगाई तालुक्यात असून तेथे एक रुग्ण आढळून आला आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आल्यानंतर बीड जिल्ह्यात खरेदी विक्रीसाठी सुट देण्यात आली आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. अनेक व्यापारी मास्क वापरत नाहीत. दुकानात विनामास्क ग्राहकांना प्रवेश देतात. सोशल डिस्टन्स ठेवत नाहीत त्यामुळे पुन्हा
एकदा बीडमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो. कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून व्यापार्‍यांसह नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या सवलतीचा योग्य वापर करावा अन्यथा पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे जिल्हाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचेच आहे. आजच्या अहवालात अंबाजोगाई १, आष्टी २५, बीड २५, धारूर १२, गेवराई २१, केज २८, माजलगाव ११, परळी ५, पाटोदा १०, शिरूर ६ आणि वडवणी तालुक्यात ७ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!