Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडशालेय पोषण आहाराचे होणार लेखा परिक्षण

शालेय पोषण आहाराचे होणार लेखा परिक्षण


किचन शेड, पिण्याचे पाणी यासह आदी सुविधांची होणार पाहणी
बीड (रिपोर्टर):- राज्यातील प्राथमिक आणि खासगी शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना मध्यान्न भोजनात शालेय पोषण आहार वाटप केला जातो. या शालेय पोषण आहाराचे ऑडीट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शाळेतील किचन शेड, पिण्याचे पाणी, जेवणाचे ताटे यासह इतर पाहणी लेखा परिक्षणाद्वारे करण्यात येणार आहे.


राज्यामध्ये ८६ हजार ४९९ शाळा आहेत. पहिली ते आठवीमध्ये शिकणार्‍या १०५ लाख विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो. या शालेय पोषण आहाराचे ऑडीट करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळेतील किचन शेड, मुलांना बसण्याची जागा, पिण्याचे पाणी, जेवणाच्या ताटा, यासह इतर बाबींची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा स्तरावर पोषण आहाराची तपासणी, कागदपत्रे शाळांना केंद्राकडून आणि राज्याकडून दिलेल्या निधीच्या तपशीलाची माहितीही शाळांकडून घेण्यात येईल. या लेखा परिक्षणासाठी नियुक्त केेलेल्या संस्थेने लेखापरिक्षणाचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकांना सादर करावयाचा आहे. त्यानंतर संचालकांकडून अहवाल केंद्र आणि राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!